दुर्दैवी: पैसे हरवले म्हणून २२ वर्षीय तरुणीची नाशिकला आत्महत्या…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयात एक धक्कादायक प्रकार घडलाय.
२२ वर्षीय तरुणीने पैसे हरविल्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आलीये.
श्रुती सानप असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
श्रुती ही मूळची बीड येथील असून ती महाविद्यालयाला लागून असलेल्या वसतिगृहात राहत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रुती ही दोन दिवसांपूर्वी मूळगावावरून परत आली होती. क्लासच्या फी साठी तिने आईवडीलांकडून सहा हजार रुपये आणले होते. मात्र प्रवासा दरम्यान तिच्याकडून पैसे हरविलेले होते. त्यामुळे ती मानसिक तणावात होती. आणि त्यातूनच तिने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिस तपासात समोर आलाय.
दरम्यान मयत श्रुती सानप ही नाशिकच्या सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयात बीएचएमएस च्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. तिने तिच्या राहत्या खोलीत आत्महत्या केली असून पंचवटी पोलिसांत मृत्यूची नोंद करण्यात आली असून पंचवटी पोलिस याबाबत अधिक तपास करत आहे. मात्र तिच्या अशा मृत्यूने शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जाते.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: मुलीचा अश्लील व्हिडिओ तयार करून 10 लाखांची खंडणी मागणारे दोघे गजाआड
कोरोनाचा धोका: महाराष्ट्रात आजपासून नवे निर्बंध: जाणून घ्या नवीन नियम…
धक्कादायक: नाशिकमध्ये प्राणायाम करताना 30 वर्षीय महिलेचा मृत्यू