धक्कादायक: नाशिकला दारुड्या मुलाच्या धक्काबुक्कीत आईचा डोके आदळल्याने मृत्यू

नाशिक: दारुड्या मुलाच्या धक्काबुक्कीत आईचा डोके आदळल्याने मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): दारुड्या मुलाने आईला धक्काबुक्की केल्याने या झटापटीत आईचा लोखंडी गेटच्या सिमेंटच्या कॉलमवर डोके आदळ्याने गंभीर मार लागून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार मेरी कॉलनी येथे उघडकीस आला.

या प्रकरणी संशयित प्रशांत कचरू पवार (वय: ३३) याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: मिरची चौक येथील उड्डाणपुलासाठी ५० कोटी मंजूर; कोंडी फुटणार !

पोलिसांनी दिलेली माहिती आणि हवालदार आनंदसिंग राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित प्रशांत पवार याने म्हसरूळ पोलिस ठाण्यात पहाटे येऊन सांगितले की मेरी कॉलनी येथे आई झोपेतून उठत नसल्याची तक्रार दिली.

पंचवटी पथकाने घटनास्थळी जाऊन पाहिले असता महिला अंथरुणावर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती. याबाबत संशयित प्रशांत पवार यास विचारपूस केली. त्यावेळी समजलेल्या माहितीप्रमाणे संशयित प्रशांत हा पहाटे मद्य प्राशन करून आला असता आई विमल पवार हिने दरवाजा उघडला. घरात घेत नसल्याने आईला त्याने जोरात धक्का दिला असता लोखंडी गेटवर डोके आदळल्याने ती खाली पडली. त्याने तिला घरात आणून झोपवले. पहाटे जाग आल्यानंतर आई जागी होत नसल्याने पळत म्हसरूळ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: नाशिक-पुणे‎ रोडवरील 24 वृक्षतोडीला हिरवा कंदील; 120 झाडे लावण्याची अट

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790