BREAKING: बापरे, एकाच शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकाच शाळेतील १५ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
येथील इगतपुरीतील मुंढेगाव आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याची धक्कादायकबाब पुढे आली आहे.
कोरोना लागण झालेल्या विद्यार्थ्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या विद्यार्थ्यांवर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आदिवासी आश्रमशाळेत 300हून अधिक विद्यार्थी आहेत. यातील 15 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाचा धोका कमी होत असताना तो वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असताना हीबाब पुढे आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील मुंढेगाव आश्रम शाळेत 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने जिल्ह्यात पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याबाबत फेरविचार व्हावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
कोरोनाची लागण झालेल्या या 15 विद्यार्थ्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. आदिवासी आश्रमशाळेत तीनशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. चार-पाच दिवसांपूर्वी यातील काही विद्यार्थ्यांना कोरोना सदृश्य लक्षणं आढळून आली होती. त्यांची एंटीजन चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह आढळून आलेत. आता सर्वच विद्यार्थ्यांची rt-pcr करण्यात आली आहे. रिपोर्टकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.