छगन भुजबळ म्हणाले, पोलीस अधीक्षक सचिन पाटिल यांची बदली थांबवणारा मी कोण?

छगन भुजबळ म्हणाले, पोलीस अधीक्षक सचिन पाटिल यांची बदली थांबवणारा मी कोण?

नाशिक (प्रतिनिधी): पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली रद्द करण्यासाठी मला निवेदन आले आहे, पण मी त्या खात्याचा मंत्री नाही. पोलिस अधीक्षक बदल्यांचा विषय गृहमंत्र्यांच्या खात्याचा विषय आहे. त्या खात्यांचे सक्षम मंत्री आहे, याशिवाय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत. मी बदली थांबविणारा कोण? असे स्पष्ट करीत, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हा विषय टोलावून लावला.

हे ही वाचा:  बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिका जखमी

नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली झाल्यानंतर आता नाशिकमधून त्यांच्या बदली रोखली जावी यासाठी विविध स्थरातून मागणी होत आहे,तर नाशिककर आणि शेतकरी वर्गाकडून देखील पाटील यांची बदली थांबावी अशी मागणी केली आहे. शहरातील अनेक भागात “नाशिकमधून पुन्हा एकदा कर्त्यव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याची बदली , “I support Sachin Patil Sir,असे बोर्ड लावण्यात आले होते..तर सोशल मिडियाच्या माध्यमातून देखील ही बदली थांबावी अशी मागणी करणाऱ्या अनेक पोस्ट सध्या नाशिकमध्ये दिसून येत आहे…

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक आक्रमक, लिलाव बंद पाडून कांदा निर्यात बंदीचा निषेध

पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या बदली रोखण्यासाठी शहरातील काही सामाजिक संघटना सक्रिय झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांकडे अडकून पडलेले पैसे काढून देण्यासाठी पाटील सक्रिय होते. त्यामुळे त्यांची बदली थांबवावी अशी मागणी आहे. त्यानुषंगाने भुजबळ यांनी हा विषय गृहमंत्र्यांकडील असल्याचे सांगत हात झटकले.

कोरोना आढावा बैठकीनंतर भुजबळ बोलत होते. ओबीसी आरक्षणावरुन निवडणूका पुढे ढकलता येणार नाही. असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश झाला असून त्याविषयी विचारले असता, भुजबळ म्हणाले की, राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूका पुढे ढकलल्या आहेत. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने निवडणूका पुढे ढकलण्याचा विषय नाही. कोरोना निर्बंधामुळे निवडणूका पुढे ढकलल्या असतांना याच लांबलेल्या काळात ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लावण्याचे काम संपवून टाकू असे शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने याविषयी मुख्यमंत्र्यासह राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष सर्वसहमतीने पुढील निर्णय घेतील.

हे ही वाचा:  बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिका जखमी

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790