चिंताजनक: नाशिक शहरात शनिवारी (दि. ८ जानेवारी) कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शनिवारी (दि. ८ जानेवारी) कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण ११०३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: ८५७, नाशिक ग्रामीण: २०१, मालेगाव: ६ तर जिल्हा बाह्य: ३९ असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८७६३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण ११९ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण ३५५० रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. यात नाशिक शहरातील २७३८ तर नाशिक ग्रामीणमधील एकूण ६७८ रुग्णांचा समावेश आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिकरोड: सेन्ट्रल जेल मध्ये दोन कैद्यांचा आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक: पहिल्या पत्नीपासून असलेल्या मुलीला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न