
क्रेटा कारच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू; संतप्त नागरिकांनी जाळली कार
नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरीजवळील मोटारसायकल व क्रेटा कारची धडक होऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, तरुणाच्या मृत्यूनंतर संतप्त स्थानिकांनी कार जाळून टाकली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम इगतपुरी पोलिस ठाण्यात सुरू होते.
शनिवारी सायंकाळी पारदेवीकडे जाणारी कार (एमएच १५ एचक्यू १३५३) व दुचाकीत (एमएच १५ जीइ ४७०८) अपघात झाला.
यात दुचाकीवरील करण प्रमोद मनोहर (१८) जागीच ठार झाला. प्रणव राजेंद्र कांबळे (१८) जखमी झाला. दरम्यान, नातेवाइकानी ग्रामीण रुग्णालयात हंबरडा फोडला. जमावाने घटनास्थळी कार जाळून टाकली. गंभीर जखमी प्रणवला नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. संशयित कारचालक रवी बिपिन सोनपाल (रा. पंचवटी) पोलिस ठाण्यात हजर झाला. उपनिरीक्षक टी. आर. साळुंखे तपास करत आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
कांदा व्यापाऱ्यांकडून तब्बल २६ कोटींची रोकड जप्त; रक्कम मोजायला लागले १९ तास
नाशिक: बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून सराफी महिलेला तब्बल १५ लाखांचा गंडा