
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे नाशिक महापालिकेने घेतला हा निर्णय !
नाशिक (प्रतिनिधी): गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमधले व्यवसाय पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.
अशातच दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा घातक असा ‘ओमिक्रॉन’ व्हेरियंट आढळून आला आहे.
हा जास्त घातक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा घातक असा ‘ओमिक्रॉन’ (Omicron) व्हेरियंट आढळल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने परदेशातून आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांचे स्क्रिनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ओमिक्रॉनची लक्षणे आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या परदेशी नागरिकांना क्वांरटाईन केले जाणार आहे.
डेल्टापेक्षाही ओमिक्रॉन घातक:
शहरात कोरोनाची पहिल्या लाटेनंतर आलेली दुसरी लाट ओसरत असताना आता प्रशासनाने तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी केली आहे. परंतु तिसऱ्या लाटेकडे लक्ष देत असतानाच दक्षिण आफ्रिकेत ‘ओमिक्रॉन’ नावाचा नवा व्हेरियंट आढळल्याने नवे संकट समोर उभे राहिले आहे. डेल्टापेक्षाही ओमिक्रॉन घातक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक शहरात दाखल होणाऱ्या परदेशी नागरिक, पर्यटकांचा शोध घेऊन स्क्रिनिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्क्रिनिंगमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास क्वारंटाईन केले जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये शनिवारी (दि. २७ नोव्हेंबर) काही प्रमाणात वाढ
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे नाशिक महापालिकेने घेतला हा निर्णय !
महत्वाची बातमी: नाशिक शहरात या दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार