कसारा घाटातील दरीत ट्रक कोसळला; चालक जागीच ठार

कसारा घाटातील दरीत ट्रक कोसळला; चालक जागीच ठार

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई-नाशिक महामार्गावरील नवीन कसारा घाटात सोमवारी (ता. १३) सकाळी सातच्या सुमारास ब्रेक फेल झाल्याने मक्याने भरलेला ट्रक (एमएच १५, ईजी ६७२६) उलटून थेट २०० फूट खोल दरीत कोसळला.

हा ट्रक कसारा घाटातून मुंबईकडे जात होता.

या अपघातात ट्रकचालक बापू रायभान आहेर (वय ४०, रा. मनमाड, ता. नांदगाव) जागीच ठार झाला.

हे ही वाचा:  नाशिक: "वर्षभराची माझी मेहनत दहा मिनिटांमध्ये वाया गेली"; गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान…

तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताचे वृत्त समजताच रूट पेट्रोलिंगचे ऑफिसर रवी देहाडे, टीम सदस्य वसीम शेख, मनोज गांगुर्डे, प्रवीण सोनवणे, सुभाष भागडे, महामार्ग पोलिस लिंगेकर, पाटील, वाहतूक पोलिस व आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल झाली. ठार झालेल्या व्यक्तीसह जखमीला बाहेर काढले. ट्रकचालकाचा मृतदेह खाली दबल्याने बाहेर काढण्यात अडचण आल्या. अपघातग्रस्त ट्रकला दरीतून क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला. रूट पेट्रोलिंग टीमचे राहुल पुरोहित, ज्ञानेश्वर पासलकर, सूरज आव्हाड, आपत्ती व्यवस्थापन टीमचे देवा वाघ, दत्ता वाताडे, बाळू मांगे यांच्यासह कसारा पोलिस ठाण्याचे कर्मचारी चौधरी, महामार्ग पोलिस घोटी केंद्राचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी मदतकार्य केले.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
BREAKING: डम्पर-कार अपघातात नाशिकच्या डॉक्टरचा मृत्यू!
नाशिक: टोळक्याने केली तरुणाला मारहाण; धारदार शस्त्राने वार
नाशिक: वडिलांच्या निधनानंतर एकुलत्या एक मुलाची आत्महत्या

हे ही वाचा:  नाशिकमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; मनमाडला गारांचा पाऊस

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790