इगतपुरीत एकाच दिवसात दाेन बिबटे वनविभागाच्या पिंजऱ्यात

इगतपुरीत एकाच दिवसात दाेन बिबटे वनविभागाच्या पिंजऱ्यात

नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरी येथे एकाच दिवसात दोन बिबटे जेरबंद झाले आहे.

काल सकाळी एका मादी बिबट्याच्या बछड्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते.

त्यानंतर अवघ्या काही तासात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मादी बिबट्या जेबंद झाला आहे.

त्यामुळे या भागात मोठ्या संख्येने बिबट्यांचा वावर असल्याचे समोर आले आहे. आता पुन्हा इगतपुरी येथील शिवाजी नगर परिसरात बिबट्या जेरबंद झाला आहे. अवघ्या बारा तासांत दोन बिबटे जेरबंद झाले आहेत. आपल्या बछड्याला शोधण्यासाठी मादी बिबट्या हा या परिसरात वावरत होता. बिबट्याचा वावर सुरु असताना डरकाळ्यानी परिसर दणाणून गेला होता. काल बिबट्याचा बछडा जेरबंद झाल्याने आता या बछड्याच्या शोधात आलेली मादी बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: खळबळजनक! सततच्या त्रासाला कंटाळून पित्यानेच सुपारी देवून मुलास धाडले यमसदनी

त्यामुळे वनविभागाच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे. असे असले तरी बिबट्यांचा मोठ्या प्रमाणावर इगतपुरी येथील मानवी वस्तीवस्तीकडे बिबट्यांचा वावर वाढल्याचे समोर आल्याने नागरिक भयभीत झाले असून वनविभागाची चिंता वाढली आहे.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790