अबब.. नाशिक जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणाहून तब्बल पाऊणे पाचशे किलो गांजा जप्त

अबब.. नाशिक जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणाहून तब्बल पाऊणे पाचशे किलो गांजा जप्त

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात तब्बल पाऊणे पाचशे किलो गांजा जप्त करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

तालुक्यातील मोहपाडे- अस्ताने रस्त्यावरील मोहपाडे शिवारातील गुरुनानक श्रीचंद भगवान मंदिर ट्रस्टच्या शेतातील गट नं. ३ मध्ये तालुका पोलिसांनी मंगळवारी (ता. १४) रात्री छापा (Raid) टाकून सुमारे २४ लाख रुपये किंमतीचा पाऊणेपाचशे किलो गांजा जप्त केला.

या प्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली असून, मुख्य संशयिताचा शोध सुरु आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापारेषणच्या प्रकल्पांना गती

तालुका भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजाची विक्री व साठवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10940,10937,10928″]

जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक प्रदीपकुमार जाधव, तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी गांजाच्या तब्बल १७ गोण्या जप्त केल्या. या प्रकरणी महेशमुनी उदासीन (रा. टोकडे) व काळू शिरसाठ (रा. खडकी) या दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. अस्लम शेख इस्माईल उर्फ अस्लम गांजावाला (रा. मालेगाव) हा मुख्य संशयित फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापारेषणच्या प्रकल्पांना गती

किल्ला पोलिस शहरातील एका गुन्ह्यात संशयितांचा शोध घेत असताना त्यांना याबाबत माहिती मिळाली. तालुका पोलिसांना त्यांनी ही माहिती दिल्यानंतर श्री. पाटील व सहकाऱ्यांनी छापा टाकून ही कारवाई केली.

पोलिसांना कारवाईत सफेद रंगाच्या गोणीत चौकोणी ठोकळे असलेला उग्र वासाचा गांजा मिळून आला. सफेद रंगाच्या गोणीत खाकी चिकटपट्टीच्या मदतीने हे ठोकळे चिटकविण्यात आले होते. या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर श्री. खाडवी, श्री. जाधव यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. अस्लम गांजावाला याने त्याच्या मालकीचा हा गांजा महेशमुनी व काळू यांच्याकडे विक्री करण्यासाठी दिल्याची माहिती मिळाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापारेषणच्या प्रकल्पांना गती

पोलिसांनी रात्री उशिरा कारवाई केल्यानंतर गांजाची मोजणी केली. मोजणी व खात्री केली. बुधवारी पहाटे या प्रकरणी पोलिस नाईक किशोर नेरकर यांच्या तक्रारीवरुन तालुका पोलिस ठाण्यात तिघा संशयितांविरुध्द अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790