नाशिक जिल्ह्यात निर्मित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इलेक्ट्रिक स्कूटरचे लाँचिंग

नाशिक जिल्ह्यात निर्मित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इलेक्ट्रिक स्कूटरचे लाँचिंग

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या उदयोजकांनी एकत्र येत स्थापन केलेल्या हयासा ई मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या हयासा ई स्कूटर्सचे लाँचिंग गुरुवारी झाले.

कंपनीची उत्पादने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. ओजस, दक्ष, इरा आणि निर्भर या चार आकर्षक मॉडेल्सची निर्मिती केली जात आहे. कंपनीचे उत्पादन दिंडोरीतील चार एकर जागेत सुरू आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वाहनांची निर्मिती करण्यात येत आहे. एका महिन्यात ६ हजार वाहनांचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. मार्च २०२२ पर्यंत हा वेग १ लाखावर पोहोचेल.

हयासा ई-मोबिलिटी कंपनीची स्थापना फेब्रुवारी २०२१ मध्ये झाली. सहा महिन्यांत आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहने उपलब्ध करण्यात नाशिककर उदयोजकांची टीम यशस्वी झाली. यातील ‘ओजस’ व ‘दक्ष’ या स्कूटर्स तरुणाईला भुरळ घालतील. ‘इरा’ हे मॉडेल महिलांना आकर्षित करेल. ‘निर्भर’ व्यावसायिकांना उपयुक्त ठरेल.

दोन तासांच्या चार्जिंगने बॅटरी पूर्ण चार्ज होईल. ज्यात ९० किलोमीटरचा प्रवास करता येईल. या चार्जिंगसाठी दोन युनिट वीज खर्च होईल. मार्च २०२२ मध्ये लिथियम बॅटरी व मोटर दिंडोरीत तयार होतील. २०२२ च्या दसरा-दिवाळीत ई-कार लॉंच करण्यात येणार असल्याचे संचालक विजय हाके व सुनीता सांगळे, प्रशांत जोशी, संदीप आयाचित, कार्यकारी अधिकारी  प्रदीप  मोटवानी यांनी सांगितले.

लवकरच इलेक्ट्रिक कारसुद्धा येणार:
विजय २००० ही इ-मोटारसायकल लवकरच बाजारपेठेत येणार आहे. एक लाखापेक्षा कमी किंमत असलेली ही मोटारसायकलवर एका चार्जिंगमध्ये २०० किलोमीटर प्रवास करता येईल. यासाठी ५ युनिट्स (फक्त ३५ रुपये) वीजखर्च होईल. २०२२ सालच्या विजयादशमीला इलेक्ट्रिक कार लाँच केली जाणार आहे. सध्या बाजारातील कारपेक्षा तिची किंमत कमी असेल.

नाशिकच्या ह्या महत्वाच्या बातम्यासुद्धा नक्की वाचा:
फरार लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर अखेर एसीबीच्या अटकेत!
१० ऑक्टोबरची यूपीएससी परीक्षा देता येणार आता नाशिकमधून!
कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये मिळणार का ? व्हायरल मेसेजचं सत्य..
नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १३ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790