नाशिककरांनो! यापुढे ‘हे’ नियम पाळले नाहीत, तर होऊ शकते कडक कारवाई

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉक डाऊन नंतर आता “मिशन बिगीन अगेन” ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहीमेअंतर्गत उद्या (दि.1 जुलै) पासून पुन्हा काही बंधनं लागू करण्यात येणार आहे. सदर नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनचालकांनी सूचनांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

आस्थापनांमध्ये सामाजिक अंतराचे नियम जे पाळणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. बॉर्डर सिलिंग पॉईंटवर विनापास प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांच्या जमावाला बंदी. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास कडक कारवाई करण्यात येईल.
एकत्र जमून पार्ट्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारचा सूचना नाशिक शहर पोलिसांतर्फे देण्यात आल्या आहेत.