जिल्ह्यात आजपर्यंत 11 हजार 781 रुग्ण कोरोनामुक्त; 4 हजार 335 रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ११ हजार ७८१  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ४ हजार ३३५ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ५३३  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक १४८, चांदवड ३५, सिन्नर १८७, दिंडोरी ६६, निफाड २२१, देवळा १२०,  नांदगांव ७९, येवला ०६, त्र्यंबकेश्वर २६, सुरगाणा १५, पेठ ००, कळवण ०२,  बागलाण ३२, इगतपुरी ४६, मालेगांव ग्रामीण ४४ असे एकूण  १०२७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार १७५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १२८  तर जिल्ह्याबाहेरील ०५  असे एकूण ४ हजार ३३५  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  १६  हजार ६४९  रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  Breaking: तुळजापूर- सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात सिन्नरच्या तिघा तरुणांचा मृत्यू

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७०.४२,  टक्के, नाशिक शहरात ६९.३१ टक्के, मालेगाव मध्ये  ८४.३३  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.७६  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७०.९६ इतके आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती : नाशिक ग्रामीण १२७, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ३००, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८६  व जिल्हा बाहेरील २० अशा एकूण ५३३  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक