नाशिक (जिल्हा प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि.३ ऑगस्ट) एकूण १०१८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात ग्रामीण १२०, नाशिक शहर ८७६, मालेगाव २२, जिल्हा बाह्य ० अशा रुग्णांचा समावेश आहे. तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण ११ मृत्यू झाले आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्रात ५, मालेगावमध्ये १ तर नाशिक ग्रामीणमध्ये ५ मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी एकूण २०८ रुग्ण बरे झाले आहेत.
त्यामुळे आता नाशिक महानगरपालिका क्षेत्रात आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४९१, एकूण कोरोना रुग्ण:- १११७२, एकूण मृत्यू:-३०० (आजचे मृत्यू ०५), घरी सोडलेले रुग्ण :- ७७४३ आणि उपचार घेत असलेले रुग्ण:- ३१२९ अशी संख्या झाली आहे.
नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १)झीनत हौसिंग सोसायटी, सिडको येथील ७५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) सावता नगर, सिडको येथील ८५ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ३) पेठरोड, फुलेनगर, नाशिक येथील ६४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) उर्वशी अपार्टमेंट,शिवाजी पुतळ्या समोर,नाशिकरोड येथील ४१ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) आदर्श नगर,पवन नगर पाण्याच्या टाकीजवळ सिडको येथील ४० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.