नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २ मे) कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ; ३३ जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात रविवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या २-३ दिवसात आकडे कमी झाले असले तरीही कोरोना अजून आपल्यातून गेलेला नाही…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी तब्बल ३६९१ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २१७९, नाशिक ग्रामीण: १३७२, मालेगाव: ४० तर जिल्हा बाह्य: १०० असा समावेश आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात रविवारी कोरोनामुळे एकूण ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ८, नाशिक ग्रामीण: २४ तर मालेगाव: १ असा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण ४८३८ इतके कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.