पालघरच्या “त्या” नवजात बालकाचा नाशिकमध्ये कोरोनामुळे मृत्यू ? प्रशासनाने दिलं हे स्पष्टीकरण..

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये पालघरहून आलेल्या एका बालकाचा नाशिकमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी रविवारी (दि. ६ जून) अनेक माध्यमांमध्ये फिरत होती. मात्र त्या बालकाचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचा खुलासा प्रशासनाने केला आहे.. मग त्या बालकाचा मृत्यू नक्की कशामुळे झाला.. जाणून घ्या…

महिला नावे सौ. अश्विनी अशोक काटेला रा. दरशेत ता.जि.पालघर या महिलेस दि. 31 मे रोजी कांता हॉस्पिटल पालघर  येथे प्रसूती होऊन केवळ १.३ किलोचे स्त्री जातीचे मूल जन्माला आले. बाळ जन्मतः कमी वजनाचे असल्याने अशा बाळांना लो बर्थ वेट (LBW) संबोधण्यात येते.

हे ही वाचा:  नाशिक शहर: आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून निर्घृण हत्या

खाजगी रूग्णालयात रँपिड टेस्ट केली असता ती पाँझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले परंतु तसे कोणतेही कागदपत्र नव्हते. बाळाची नाजूक स्थिती बघता त्यांना त्वरित जव्हार येथे सरकारी रुग्णालय दाखल करण्यात आले. बाळाला श्वास घेण्यास त्रास होता.जव्हार येथील रुग्णालयात दाखल झाल्यानंतर बाळाची व आईची दोघांचीही कोविड रॅपिड आणि rt-pcr तपासणी करण्यात आली. दोघांचाही चाचण्या निगेटिव आल्या.  बाळाची परिस्थिती आणखी खालवल्याने दि. २ जुन रोजी जिल्हा रूग्णालय नाशिक येथे संदर्भित करण्यात आले.

हे ही वाचा:  नाशिक हादरलं! तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून निर्घृण हत्या

सदर बाळ हे जन्मतः कमी वजनाचे असल्या कारणाने अशा बाळांची फुप्फुसांची वाढ पूर्णपणे होत नाही आणि त्यामुळे अशा बाळांना श्वास घ्यायला त्रास होतो तसेच या बाळास Sclerema असल्याकारणाने (हा एक प्रकारचा जंतुसंसर्ग असतो) लहान बाळांमध्ये बऱ्याच वेळा दिसून येतो. बाळाला व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले आणि सर्वोपचार करण्यात आले होते.नाशिक जिल्हा रूग्णालयातील बालरोग तज्ञांनी शर्थीने प्रयत्न करुन देखील बाळाची परिस्थिती नाजूक असल्याकारणाने दि. ०५ जून रोजी पहाटे सदर बाळाचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला; सोमेश्वर धबधब्यात पडून युवतीचा मृत्यू

मृत्यू हा श्वास घेण्यास त्रास होणे आणि इतर अवयवांची वाढ न झाल्याने तसेच अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने झाली आहे. त्यामुळे सदर महिला कोविड निगेटिव्ह आणि जव्हार सरकारी रुग्णालयातील बाळचे  रँपिड तसेच RTPCR अहवाल निगेटिव्ह आल्याने सदर मृत्यु कोविड मुळे झालेला नाही, असं स्पष्टीकरण नाशिक जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिले आहे.