नाशिक जिल्ह्यात सध्या इतक्या कोरोना रुग्णांवर उपचार सुरु

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ७७ हजार ७७६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ६ हजार १६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच  उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ५७९ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ४ हजार ९४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ४०७,  बागलाण २२३, चांदवड २१९, देवळा ९०, दिंडोरी ३०९, इगतपुरी ७८, कळवण १६२, मालेगाव १८६, नांदगाव १६९, निफाड ४६७, पेठ १६, सिन्नर ६८६ , सुरगाणा २९, त्र्यंबकेश्वर १०, येवला ८१ असे एकूण ३ हजार १३२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ८२६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १९२  तर जिल्ह्याबाहेरील १९  रुग्ण असून असे एकूण ६ हजार १६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८८ हजार ८८५ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९६.२२ टक्के, नाशिक शहरात ९७.८० टक्के, मालेगाव मध्ये ९५.८९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.७६ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.१४ इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण २ हजार ४०८ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २ हजार ११३ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३१९ व जिल्हा बाहेरील १०० अशा एकूण ४ हजार ९४० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
(वरील आकडेवारी ही दि. ७ जून २०२१ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790