रेमडेसिविरची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या डॉक्टरची सनद रद्द करा

नाशिक (प्रतिनिधी): रेमडेसिविरची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या संशयित डॉ. रवींद्र श्रीधर मुळक यांची डॉक्टर ही सनद रद्द करण्याचे पत्र सहायक पोलिस आयुक्त यांच्या कार्यालयाने महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद यांना पाठवले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात सद्गुरू हॉस्पिटलचे संचालक डॉ. मुळक यांच्या विरोधात फसवणूक, औषध किंमत नियंत्रण आदेश, अत्यावश्यक कायदा, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: ३० लाखांच्या कपड्याच्या मालाचा अपहार केल्याप्रकरणी दोघांना अटक !

या बाबत सहायक आयुक्त प्रदीप जाधव यांनी दिलेल्या पत्रकानुसार डॉ. रवींद्र श्रीधर मुळक, लोकसेवक हे महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद सदस्य नोंदणी प्रमाणपत्रधारक डॉक्टर आहेत. कोविड-१९ प्रादुर्भावामुळे रेमडेसिविर औषध पुरवठा वाढत्या रुग्ण संख्येच्या प्रमाणात कमी असल्याचे माहिती असताना जाणीवपूर्वक त्याचा काळाबाजार करून अवाजवी किमतीत विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःकडे बाळगले असे तपासात निष्पन्न झाले आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून शासन आदेशाचे उल्लंघन असल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या नोंदणी प्रमाणपत्र वरील तरतुदीचे उल्लंघन करणारे आहे. यामुळे डॉ. रवींद्र मुळक यांची महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र असलेली सनद तत्काळ रद्द होणे याबाबत पत्र देण्यात आले आहे.

👉 हे ही वाचा:  रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मंजुरी

याप्रकरणी औषध निरीक्षक सुरेश देशमुख यांच्या तक्रारीनुसार १२ एप्रिलला पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. मुळक हे एक रेमडेसिविर २५ हजार रुपये दराने विक्री करत होते. मोहिते नामक व्यक्तीने ही बाब पंचवटी पोलिसांना कळवली होतो. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत डॉ. मुळकला तीन रेमडेसिविरसह अटक केली होती. वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790