नाशिक शहरात शुक्रवारी (दि. १६ एप्रिल) कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये वाढ; ४१ मृत्यू

नाशिक शहरात शुक्रवारी कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शुक्रवारी ४४३५ इतक्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. यात नाशिक शहर: २४०३, नाशिक ग्रामीण: १८३२, मालेगाव: १५०, जिल्हा बाह्य: ५० असा समावेश आहे.. तर नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी ४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ९, मालेगाव: ४, नाशिक ग्रामीण: २६ तर जिल्हा बाह्य: २ असा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात 1 कोटीचा गुटखा जप्त; इगतपुरी पोलीसांची मोठी कामगिरी
3d Render Bacterium closeup (depth of field)

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १)प्लॉट क्र.१७,आदर्श सोसायटी,सिडको कॉलनी, नाशिक येथील ४५ वर्षीय महिला, २) फ्लॅट क्र.९,आनंद रेसिडेन्सी,देवळाली कॅम्प नाशिकरोड येथील ५५ वर्षीय महिला, ३) श्री दर्शन अपार्टमेंट,रूम क्र.९, सातपूर,नाशिक येथील ५४ वर्षीय पुरुष व्यक्ती, ४) ३०३ रॉयल,कोणार्क नगर, पंचवटी येथील ५२ वर्षीय पुरुष व्यक्ती, ५) स्वारबाबा नगर,सिद्धार्थ चौक,सातपूर,नाशिक येथील ३० वर्षीय पुरुष व्यक्ती, ६) जेलरोड,नाशिक येथील ७२ वर्षीय वृद्ध महिला, ७) सिडको,नाशिक येथील ५४ वर्षीय पुरुष व्यक्ती, ८) तिडके कॉलनी, नाशिक येथील ५४ वर्षीय पुरुष व्यक्ती, ९) रायगड चौक,सावता नगर,नाशिक येथील ५२ वर्षीय पुरुष व्यक्ती असा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात 1 कोटीचा गुटखा जप्त; इगतपुरी पोलीसांची मोठी कामगिरी

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790