नाशिक शहरातील या भागात १५ दिवसांचा लॉकडाऊन !

नाशिक शहरातील या भागात १५ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे…

नाशिक (प्रतिनिधी): दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोनाची रुग्णसंख्या व मृत्युच्या घटना बघता कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे. शासनाला थेट लॉकडाऊनचा निर्णय घेणे अडचणीचे असले तरी सामाजिक भावनेतून अधिक निर्बंध असणे गरजेचे आहे. त्यामुळे कारखाने वगळता सातपूर शहर १५ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचे पत्र आमदार सीमा हिरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून जिल्हाधिकाऱ्यांनीही सातपूरकरांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

हे ही वाचा:  Breaking: अंबड पोलीस ठाण्यात डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

कोरोनाचा उद्रेक वाढतच चालला आहे. अनेक रुग्णांना हॉस्पिटल्समध्ये बेडही मिळत नाहीत. ऑक्सिजन व रेमडेसिविरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. उपचाराअभावी अनेक बाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे. मन सुन्न करणारा कोरोनाचा हा संसर्ग रोखण्यासाठी साखळी तोडणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने लागू केलेले निर्बंध अधिक कडक करण्याची गरज आहे. मात्र शासनाकडून पूर्णत: लॉकडाऊन करण्याची शक्यता कमीच असल्याने स्थानिक पातळीवर आपणच निर्णय घेऊन १५ दिवसांसाठी सातपूर शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी घेतला.

हे ही वाचा:  नाशिक ग्रेप हार्वेस्ट महोत्सव-2024 चे 24 व 25 फेब्रुवारी रोजी आयोजन

यासंदर्भात हॉटेल अयोध्या येथे सीमा हिरे यांच्या अध्यक्षतेखाली फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून बैठक घेण्यात अाली. नगरसेवक दिनकर पाटील, सलीम शेख, विलास शिंदे, शशीकांत जाधव, दीपक मौले आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस नगरसेवक योगेश शेवरे, संतोष गायकवाड, भागवत आरोटे, बसपाचे जिल्हाध्यक्ष अरुण काळे, बांधकाम व्यावसायिक गणेश बोलकर, उद्योजक स्वप्नील पाटील, नितीन निगळ, शंकर पाटील, गौरव जाधव, जीवन रायते, देवा जाधव, बाळासाहेब जाधव, राजेश दराडे, भाजपा सातपूर मंडल अध्यक्ष अमोल इघे, आदी उपस्थित होते.

हे ही वाचा:  नाशिक: रामकुंडावरील वस्त्रांतरगृह महापालिका घेणार ताब्यात; बंदोबस्ताची मागणी

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790