नाशिक शहरात शनिवारी (दि. 13 जून) चार कोरोनाबाधित रुग्ण

नाशिक (प्रतिनिधी): शहरात शनिवारी दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण चार रुग्ण कोरोनाबाधित आढळून आहे आहेत. त्यामुळे आता शहरात एकूण कोरोना रुग्ण:-५७५, एकूण मृत्यू:- २९,  घरी सोडलेले रुग्ण:- २१६ उपचार घेत असलेले रुग्ण:- ३३० अशी संख्या झाली आहे.

आज आढळून आलेल्या कोरोनाबाधीतांची हिस्ट्री:

बिडी कामगार, अमृतधाम पंचवटी येथील ३९ वर्षीय महिलेचा कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून ही महिला जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहे.

जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड येथील ५५ वर्षीय रहिवासी कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.

आरटीओ ऑफिस जवळ साईधाम रोड पंचवटी येथील ४७ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

सुख सागर अपार्टमेंट,फ्लॅट क्र १६, कालिका पेट्रोल पंपाजवळ नाशिक येथील ४५ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.