नाशिक शहरात रविवारी 49 कोरोनाबाधित रुग्ण; 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): शहरात रविवारी (दि. २१ जून २०२०) रात्री साडे आठ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात एकूण ४९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे एकूण सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता: एकूण कोरोना रुग्ण:-१२०९ एकूण मृत्यू:-६२(आजचे मृत्यू-०६)  घरी सोडलेले रुग्ण :- ५०४ उपचार घेत असलेले रुग्ण:- ६४३ अशी संख्या झाली आहे.

रविवारी रात्री साडे आठ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: बुधवार पेठ-१, जोग वाडा (जुने नाशिक)-१, फुले नगर-१, हिरावाडी-१, बळी मंदिर (औरंगाबाद रोड)-१, रॉयल कॉलनी-१, पिंजर घाट-१, द्वारका-१, हरी मंदिर (कथडा)-१, महात्मा फुले (सरकारी वसाहत, टिळकवाडी)-१, पंचवटी कारंजा-१, स्नेह नगर (दिंडोरी रोड)-१, जय भवानी रोड (नाशिकरोड)-१, साई नगर (दिंडोरी रोड)-१, दिंडोरी रोड-१, गोसावी वाडी( नाशिकरोड)-१, गंजमाळ-१, इतर-१, महात्मा फुले चौक-१, औदुंबर चौक (सिडको)-२, सिडको-१, टकले नगर-३, कासक पार्क (पखाल रोड)-३, खडकाळी-४, सहकार नगर-१, वडाळा-३, सातपूर-१, श्रमिक नगर (सातपूर)-१, वडाळा गाव (मेहेबुब नगर)-१, फुले नगर-१, पखाल रोड- ६ असे एकूण ४९ रुग्ण आढळून आले आहेत.मयत रुग्णांची माहिती- १) ५,धनील अपार्टमेंट,काठे गल्ली, द्वारका येथील ४५ वर्षीय महिलेचे दिनांक २० जून २०२० रोजी निधन झालेले आहे.२)३०७६, बागवान पुरा,द्वारका येथील ७२ वर्षीय वृद्ध महिलेचे दि.२० जून २०२० रोजी निधन झालेले आहे.३)फुलेनगर नाशिक येथील ६५वर्षीय वृद्ध महिलेचे दिनांक १९ जून २०२० रोजी निधन झालेले आहे.४) त्रिमूर्ती नगर,मायको हॉस्पिटल जवळ नाशिक  येथील ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचे दिनांक २१ जून २०२० रोजी निधन झालेले आहे.५) केतकी नगर,नाशिक येथील ६७ वर्षीय वृद्ध व्यक्तीचे दिनांक १९ जून २०२० रोजी निधन झालेले आहे.६)वृंदावन कॉलनी पखाल रोड येथील ७० वर्षीय  वृद्ध पुरुषाचे दिनांक २० जून २०२० रोजी निधन झालेले आहे.

हे ही वाचा:  नाशिक हादरलं! तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून निर्घृण हत्या