नाशिक शहरात रविवारी (दि. 5 जुलै) 151 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात रविवारी (दि. ५ जुलै) १५१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २०४ एकूण कोरोना रुग्ण:-२८७४ एकूण मृत्यू:-१३२ (आजचे मृत्यू ०५)  घरी सोडलेले रुग्ण :- १३६६ उपचार घेत असलेले रुग्ण:- १३७६ अशी संख्या झाली आहे.

रविवारी आढळून आलेल्या रुग्णांची परिसरनिहाय यादी इथे क्लिक करून डाऊनलोड करा.

मयत रुग्णांची माहिती- १)ताहीर अपार्टमेंट, गायकवाड नगर येथील ८० वर्षीय वृद्ध पुरुष हे उपचारासाठी दि.०६ जून२०२० रोजी उपचारासाठी दाखल झाले होते.त्यांचे दि.०३ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे. २)हरी नगरी, बागवान पुरा, अमरधाम रोड येथील ४५ वर्षीय पुरुष व्यक्ती दि.१७ जून २०२० रोजी उपचारासाठी दाखल झाले होते.त्यांचे दि.०३ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे. ३)पंचवटी नाशिक येथील ४५ वर्षीय महिला दि.०३ जुलै २०२० रोजी उपचारासाठी दाखल झाले होते.त्यांचे दि.०५ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे. ४)हरी बहर, सोसायटी, समता नगर नाशिक येथील ७३ वर्षीय पुरुष व्यक्ती दि.०३ जुलै २०२० रोजी उपचारासाठी दाखल झाले होते.त्यांचे दि.०४ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे. ५)इंदिरा गांधी वसाहत,लेखानगर,सिडको येथील ५२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती दि.३० जून २०२० रोजी रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती त्यांचे दि.०२ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे.