रुग्णाकडून ज्यादा बिल आकारले; पायोनियर हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस

नाशिक (प्रतिनिधी): कोरोना रुग्णाकडून शासनाने निश्चित केलेले दरापेक्षा ज्यादा दर आकारणी केल्याबाबतच्या आलेल्या तक्रारीवरून शहरातील पायोनियर हॉस्पिटलला नाशिक महानगरपालिकेच्या वतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली आहे.  शासनाने कोरोना रुग्णांवर उपचार करताना खाजगी रुग्णालयांनी दर आकारणी बाबत दर निश्चित करून दिलेले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: मालट्रकने दिलेल्या धडकेत २१ वर्षीय दुचाकीस्वार ठार

याबाबत वारंवार आवाहन करून देखील काही रुग्णालय याबाबत दक्षता घेत नसल्याचे प्राप्त तक्रारीवरून लक्षात आले आहे. या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने संबंधित हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस देऊन त्याबाबतची बिलांची तपासणी केली जात आहे. या अनुषंगाने मनपाचे मुख्य लेखा परिक्षक यांच्याकडे रुग्णाने भ्रमणध्वनीद्वारे पायोनियर हॉस्पिटल, अशोका मार्ग, नाशिक यांनी जादा बिलाची आकारणी केल्या बाबतची तक्रार केली होती.त्यात या हॉस्पिटलने या रुग्णाकडून एक पी पी ई किट ची किंमत एक दिवसासाठी रु.१०,५००/- इतकी आकारलेली आहे. रुग्णावर दहा दिवसच उपचार सुरू असताना कन्सल्टींग चार्जेस पंधरा दिवसाचे लावले आहेत.याबाबत रुग्णाचे बिल व अनुषंगिक कागदपत्रे इकडील कार्यालयात सादर करणेबाबत वेळोवेळी भ्रमणध्वनीद्वारे कळविले असता त्यांनी अद्याप याबाबतची कागदपत्रे सादर केलेली नाहीत ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची व कायदा भंग करणारी असल्याने पायोनियर हॉस्पिटल, नाशिक यांना मुख्य लेखापरीक्षक बी.जे.सोनकांबळे यांनी मनपाच्या वतीने कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली असल्याची माहिती यांनी दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group