नाशिक(प्रतिनिधी): शुक्रवारी (दि.२२ मे २०२०) रोजी सायंकाळी ८ वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार नाशिक शहरात तब्बल ११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये: अंबड सातपूर लिंक रोड (सातपूर) येथील ४९ वर्षीय पुरुष, १८ वर्षीय पुरुष, १३ वर्षीय पुरुष, सुप्रभात अपार्टमेंट, अंबड लिंक रोड येथील ११ वर्षीय मुलगी, १३ वर्षीय मुलगी आणि ७ वर्षीय मुलगी, हमीद नगर येथील ३२ वर्षीय महिला आणि ७ वर्षीय मुलगा. वडाळागाव येथील ४६ वर्षीय पुरुष, पेठ रोड येथील ३६ वर्षीय पुरुष, आणि सिडको येथील ४७ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. शहरात आढळून आलेल्या रुग्णांचे सविस्तर रहिवास पत्ते अजून प्राप्त झालेले नाहीत.