नाशिक(प्रतिनिधी): नाशिक परिसरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या गुरुवारपर्यंत १२ होती, त्यापैकी ४ रुग्ण हे मुंबईतील रहिवाशी आहेत हे मुंबईहुन देवळा येथे आले होते. त्यांच्या घरातील महिलेला सर्दी खोकल्याचा त्रास झाला म्हणून खाजगी रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले होते उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या संपर्कातील ५ संशयितांना डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांचे स्वाब घेतले असता त्यांच्यातील ४ जणांचे स्वाब पॉझिटिव्ह आलेले आहेत.
तसेच दि.१६ मे २०२० रोजी हृदयाचा त्रास होत असल्याने अशोका हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल झालेले वयोवृद्ध हे मुंबईहून तीन दिवसापूर्वी नाशकात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले त्यानंतर ते पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील ३ जणांना तपोवन येथील कोरोना कक्षात दाखल करून घेण्यात आले त्यापैकी २ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत हे पंचवटी परिसरातील रहिवासी आहेत.तसेच निमोण ता.संगमनेर येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १ व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत त्यांचे मुलाचे राहते घर पोलीस हेडक्वार्टर हे असून डॉ.झाकीर हुसेन रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शहरात रहिवासी असणारे ५ कोरोना बाधित रुग्ण मिळून आले असून संजीव नगर येथील मयत झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील २ व्यक्ती बाधित असल्याचा अहवाल आला असून त्यांच्या संपर्कातील ५३ जणांचे स्वाब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. शिवाजी वाडी येथे १ किराणा दुकानदार याला श्वासाचा त्रास होत असल्याने दिनांक २० मे रोजी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करून घेण्यात आले त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून त्याच्या संपर्कातील १२ जणांचे स्वाब तपासणी पाठवण्यात आले आहेत.
मोठा राजवाडा येथील रहिवाशी मनपाची सफाई कर्मचारी यांना श्वास लागणे व सर्दी ताप आदिचा त्रास होत असल्याने दिनांक २० मे २०२० रोजी त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.त्यांचा त्यांचा स्वाब अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.नाईकवाडी पुरा येथील रहिवाशी येथील महिला यांना सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्याने त्यांचे स्वाब घेण्यात आले ते पॉझिटिव्ह आले असून त्यांच्या संपर्कातील १० जणांचे स्वाब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.