नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सोमवारी निर्बंधांचे आदेश काढले. यात प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सर्व दुकाने आणि धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद राहतील असेही सांगण्यात आले आहे. हे निर्बंध जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे, दुध या बाबींना लागू राहणार नाही. शनिवारी व रविवारी सुट्टीचा फायदा घेऊन होणारी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने हे निर्देश देण्यात आले आहेत.
महत्वाचे: शनिवार व रविवार नाशिकमधील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश
2 years ago