मालेगाव: 440 पैकी 439 अहवाल निगेटिव्ह आणि 1 पॉझिटिव्ह

मालेगाव(प्रतिनिधी): आज मालेगाव येथील ४४० अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी ४३९ अहवाल निगेटिव्ह आहेत ही खरोखरच आपल्याला दिलासा देणारी बाब आहे. तसेच १ अहवाल पूर्विच्याच कोरोना बाधिताचा पॉझिटीव्ह आला आहे. मालेगाव मध्ये कोरोना बाधीत ३३ रुग्णांवर १४ दिवस अत्यंत उत्तम प्रकारे वैधकीय अधिकारी व पथकाने उपचार करुन त्यांचे नमुने परत तपासणीस पाठविले असता त्या ३३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

हे सर्व ३३ रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात अजून काही कोरोनामुक्त होणार असल्याचे संकेतही मिळत आहेत. मालेगाव तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असून आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र घेतलेल्या मेहनतीचे हे फलीत आहे. रुग्णालयातील सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, इतर सर्व कोरोना रुग्णही या रुग्णांप्रमाणे लवकरच बरे होतील, असा विश्वास वाटतो.