आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास आवश्यक.. असा काढा ई-पास

लॉकडाऊन दरम्यान एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी इ पास आवश्यक!

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनामुळे सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. या दरम्यान शहर व जिल्ह्याबाहेर प्रवास करायचा असेल तर त्यासाठी आता इ-पास लागणार आहे. यासाठी ग्रामीण आणि शहर पोलिस दलाने संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे. ग्रामीण आणि शहर पोलिस दलाच्या नजीकच्या पोलिस ठाण्यातही इ-पास दिला जाणार आहे. या पासशिवाय शहर- जिल्ह्यातून बाहेर जाता येणार नाही.

इ-पाससाठी https:/covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर जावे. आधी सर्व सूचना वाचून घ्या. Apply For Pass Here यावर क्लिक करा. ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा तो जिल्हा निवडा. जिल्हा किंवा पोलिस आयुक्तालय निवडा, संपूर्ण नाव, प्रवास कोणत्या तारखेपासून ते कोणत्या तारखेपर्यंत करणार, मोबाइल नंबर नोंदवा. प्रवासाचे कारण आणि प्रवासाचा उद्देश याची नोंद करा. वाहनाचा प्रकार, वाहनाचा नोंदणी क्रमांक, सध्याचा पत्ता आणि इ-मेल नोंद करा. प्रवासाला सुरुवात कोठून करणार ते ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण, सहप्रवासी संख्या नोदवा.

आपण कंटेन्मेंट झोनमधील आहात का? होय नाही द्या परतीचा प्रवास याच मार्गानं करणार, ते सांगा २०० केबीपेक्षा लहान साइजचा फोटो अपलोड करा. आवश्यक ती कागदपत्रे निवडा. अर्ज सबमिट करा. अर्ज केल्यानंतर एक टोकन आयडी तुम्हाला देण्यात येईल.पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही टोकण आयडी क्र. नोंदवून इ-पास डाऊनलोड करू घ्या आणि त्याची प्रिंट काढून घ्या. इ-पासची मूळ कॉपी आणि झेरॉक्सही स्वत:कडे ठेवा. तसेच नजीकच्या पोलिस ठाण्यात वरिष्ठ अधिकारी यांच्या परवानगीने इ-पास दिले जाणार आहे.