नाशिक शहरातल्या या ४ खाजगी रुग्णालयांना मनपाचा दणका !

नाशिक शहरातल्या या ४ खाजगी रुग्णालयांना मनपाने चांगलाच दणका दिला आहे..

प्रतीकात्मक छायाचित्र

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील ४ खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे दाखल असलेल्या ८०% बेड वरील कोरोना रुग्णांची देयके नियुक्त लेखा परीक्षकांना तपासणीसाठी न दिल्याने व मनपाने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन न केल्याबाबत नोटिसा देण्यात आली असल्याची माहिती मुख्य लेखा परीक्षक बी.जे. सोनकांबळे यांनी दिली.

नाशिक महानगर पालिकेच्या वतीने शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये ८०% बेड वर कोरोनाचे रुग्ण दाखल झाल्यानंतर त्या रुग्णांना डिस्चार्ज होण्याच्या वेळी शासन दराने खाजगी रुग्णालयांनी शासन दराने देयके आकारणी केली आहे की नाही याची खात्री करण्यासाठी रुग्णालय निहाय लेखापरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: अवैध सावकार वैभव देवरेने ४ लाख रुपयांचे उकळले २८ लाख; १८ पर्यंत पोलिस कोठडी

त्या लेखा परिक्षकांकडे १ एप्रिल  २०२१ पासून अद्याप पावेतो देयके तपासणीसाठी न दिल्याची तक्रार नियुक्त लेखापरीक्षकांनी कडून प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने त्या खासगी रुग्णालयांची पाहणी मुख्य लेखा परिक्षक यांच्यासह पथकाने केली असता मनपाने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन केलेले नसल्याचे आढळून आले.

तसेच दर्शनी भागात लेखापरीक्षकांची नाव व मोबाईल नंबरचा फलक लावलेला नाही अश्या स्वरूपाच्या नियमांचे पालन न केल्याने शहरातील १)रामालयम  हॉस्पिटल, दिंडोरी रोड,पंचवटी २)मानस हॉस्पिटल, तुपसाखरे लॉन्स, मुंबई नाका, ३) साईनाथ हॉस्पिटल, अशोक नगर,सातपूर, ४)जीवन ज्योती हॉस्पिटल, त्र्यंबक रोड, सातपूर या ४ रुग्णालयांना नोटीस देण्यात आल्या असून १ एप्रिल २०२१ पासून आज दि.२३/०४/२०२१ पर्यंतची ८०% बेड वरील कोरोना रुग्णांची देयके ३ दिवसात तपासणी साठी उपलब्ध करून देण्यात यावी असे त्यामध्ये नमूद केले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: कंपनीच्या मालाची परस्पर विक्री; १५ लाखांचा अपहार

ती उपलब्ध न करून दिल्यास रुग्णालय व्यवस्थापन विरुद्ध साथरोग अधिनियम १८५७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-२००५,महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० नुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य लेखा परिक्षक बी.जे सोनकांबळे यांनी दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790