नाशिक शहरातील नवश्या गणपती आणि नाशिकरोडचा काही भाग प्रतिबंधित !

नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसात दोन नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे ते ज्या भागात राहतात ते भाग काही दिवसांकरिता प्रतिबंधित करण्यात आले आहेत. म्हणजेच त्या भागातून कुणी बाहेर जाऊ शकत नाही किंवा त्या भागात आत कुणी येऊ शकत नाही. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून ह्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे नाशिक महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आता या भागात सर्वेक्षण सुरु करणार आहे. प्रत्येक नागरिकांनी त्यांना सहकार्य करून योग्य आणि अचूक माहिती द्यायची आहेत.

गंगापूर रोड परिसरातील प्रतिबंधित भागाचा नकाशा

नाशिकरोड परिसरातील प्रतिबंधित भागाचा नकाशा