कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक महापालिकेची मोबाईलवर हेल्पलाईन

नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे, त्यामुळे आता शहरात या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महापालिकेने प्रभावी उपाय केले आहेत..कोरोना कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने मोबाईल क्रमांकावर हेल्पलाईन सुरू केलेली आहे. त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी वापर करावा असे आवाहन करणेत येत आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत असताना त्याचाच भाग असुन अत्याधुनिक IVR व SMS प्रणाली सुरु केली आहे. त्या अंतर्गत 9821188189 या मोबाईल नंबरवर हेल्पलाईन सुरु केलेली आहे.या हेल्पलाईन नंबरव्दारे शहरातील नागरीक मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेवु शकतात. तसेच शहरातील जास्तीत जास्त नागरीकांचा आरोग्य सर्व्हे करण्यात येत आहे त्यासाठी SMS प्रणालीव्दारे नागरीकांना covid19.nmc.gov.in  ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे हि लिंक उघडल्यानंतर त्यात सर्व्हे फॉर्म दिसेल त्यात नागरीकांनी Online माहिती भरावयाची आहे.सदर माहितीच्या आधारे कोरोना सदृष्य आजार असलेल्या नागरीकांपर्यंत महानगरपालिकेस पोहोचता येईल व त्यावर तातडीने पुढील वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देता येईल.

या सर्व्हेच्या माहितीव्दारे महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणु या साथ रोगाची साखळी तोडण्यात बहुमुल्य मदत होणार आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी या सर्व्हे लिंक चा उपयोग करुन त्यात आरोग्य विषयक माहिती दयावी. सर्व्हे लिंकची माहिती नागरीकांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावी असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे नाशिक यांनी केले आहे.

 नाशिक मनपा, नाशिक स्मार्ट सिटी, व IT Association Nashik यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करणेत आलेल्या याप्रणालीव्दारे शहरातील सर्व नागरीकापर्यंत पोहचण्याचे उद्दीष्ट आहे.प्राप्त माहितीच्या आधारे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याविषयी माहिती महानगरपालिकेस मिळून करोनासंदर्भात तात्काळ कार्यवाही करणे शक्य होणार आहे.

IVR प्रणालीची वैशिष्टे :

  • अत्याधुनिक IVR (Interactive Voice Response System)चा वापर करुन 24 X 7  सेवा उपलब्ध
  • नागरीकांसाठी हेल्पलाईनवर तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध
  • COVID-19 आजारांच्या लक्षणांची माहिती नागरीकांना मिळणार आहे.
  • प्रणालीमध्ये कोरोना हॉस्पीटलची माहिती व संपर्क क्रमांक उपलब्ध
  • प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत घ्यावयाची काळजी बाबत माहिती
  • होम कोरंटाईन अथवा अलगीकरणाबाबत माहिती

मनपाच्या www.nmc.gov.in या वेबसाईटवर नागरीकांसाठी विविध मोबाईल ॲपची व हेल्पलाईन व दुरध्वनी क्रमांकांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790