सिडकोत खासगी वॉटर प्युरिफिकेशन प्लांटची आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश !

नाशिक (प्रतिनिधी): सेंट लॉरेन्स स्कूल , सिहस्थ नगर , सिडको येथील अक्चा ट्रेंड कंपनीला 12 तारखेला दुपारी ४ वाजता आग लागली. ही कंपनी म्हणजे पाणी शुद्ध करण्याचा कारखाना आहे. या ठिकाणी प्लास्टिक जार,प्लास्टिक शिट व पाणी बॉटल, पॅकिंग मटेरियल इ. वस्तु यांना आग लागली होती. सिडको अग्निशमन केंद्राचा व सातपूर केंद्राचा १/१ अशा २ बंबानी मिळून संपूर्ण आग विझवुन , आजुबाजुचा परिसर वाचवुन पुढील होणारा अनर्थ टळला ! ही आग विझवण्यासाठी अग्निशमन कर्मचारी सब ऑफिसर- जगदीश आहिरे, लि. फायरमन- शिवाजी मतवाड, गजेंद्र औसरकर वाहन चालक- इस्माईल काझी, जी. व्ही. पवार, फायरमन- बाळासाहेब लहांगे , संजय गाडेकर, कांतीलाल पवार , राजेंद्र नाकिल, इत्यादी जवानांनी आग विझविण्यास परिश्रम घेतले !

हे ही वाचा:  नाशिक: व्याजासह पैसे भरूनही घर बळकावले; तिघा खासगी सावकारांना पोलिसांकडून अटक !

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790