क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांना राष्ट्रपती पदक जाहीर!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांना उद्या (दि.१५) पोलीस दलातील सर्वोच्च सन्मानाचे राष्ट्रपती पदक देण्यात येणार आहे. डॉ. सीताराम कोल्हे यांनी पोलीस म्हणून नोकरी करत असतांना “क्रिमिनल सायकोलोजी” चा सुद्धा अभ्यास केला. आणि याचा वापर त्यांनी वैयक्तिक आणि सामाजिक मार्गदर्शनासाठी सुद्धा केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम करत असतांना कोविड-१९ च्या काळात त्यांना “नोडल अधिकारी” या पदाची जबाबदारी देण्यात आली होती. हा पदभार सुद्धा त्यांनी उत्कृष्टरित्या पार पाडला. २८ वर्षांच्या या कार्यकाळात त्यांना सुमारे ६०० बक्षिसे आणि ८५ प्रशंसापत्रे आणि तबलावादनात पदवीसुद्धा त्यांना मिळाली आहे.