नाशिक शहरात शुक्रवारी (दि. १४ ऑगस्ट) ६२५ कोरोना पॉझिटिव्ह; ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शुक्रवारी (दि. १४ ऑगस्ट) ६२५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १४३५, एकूण कोरोना  रुग्ण:-१५,७७०, एकूण मृत्यू:-३८६ (आजचे मृत्यू ०५), घरी सोडलेले रुग्ण :- १२,०१८, उपचार घेत असलेले रुग्ण:- ३३६६ अशी संख्या झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी प्राप्त करण्यासाठी इथे क्लिक करा..

हे ही वाचा:  नाशिक: पैसे दिले नाहीत म्हणून आईलाच जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) शेवंता पार्क,रोशन अपार्टमेंट, राणे नगर नाशिक येथील ४० वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. २) प्लॉट क्रमांक ४८, सर्व्हे क्रमांक १९२, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक येथील २२ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ३) नाशिकरोड, नाशिक येथील ३५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) सिडको, नाशिक येथील ८२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) उपवन कॉम्प्लेक्स, काळाराम मंदिरासमोर,पंचवटी नाशिक येथील ६४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: घंटागाडीचे ब्रेक फेल झाल्याने अपघात; 2 चारचाकीचे नुकसान

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790