नाशिक: ‘ह्या’ कारणामुळे बहिणीकडून सख्ख्या भावाचा खून

NPA GOLD LOAN

नाशिक: ‘ह्या’ कारणामुळे बहिणीकडून सख्ख्या भावाचा खून

नाशिक (प्रतिनिधी): बहिणीने भावाची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी मनमाड शहरातील विवेकानंद नगर परिसरात घडली.

या घटनेत संदीप उर्फ बाळू भगवानराव गोंगे (४५) या भावाचा मृत्यू झाला.

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

याबाबतची माहिती अशी की, शोभा गारुडकर (५५, रा. श्रीरामपूर) आणि बाळू गोंगे (रा. विवेकानंदनगर, मनमाड) हे दोघे बहिण भाऊ आहेत.

शोभा यांच्या मुलीचे १५ एप्रिलला मनमाड येथे निधन झाले. त्यामुळे शोभा मनमाडमध्ये माहेरी आल्या होत्या. भाऊ बाळू मद्यपान करून मंगळवारी दुपारी घरी आला. यानंतर बहिणीस शिवीगाळ व भांडण करू लागला.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10548,10545,10543″]

असे प्रकार नेहमीच होत असत. पण मंगळवारी या कृत्याचा बहिणीला राग आला. तिने भावाला धाक दाखविण्यासाठी चाकू हातात घेऊन धाक दाखवत असताना हा चाकू बाळू याच्या पोटात आरपार घुसून अति रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रभारी पोलिस अधिकारी पी. बी. गिते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरू होती. भावाचा खून झाल्याने बहिणीने स्वत:हून पोलिस ठाण्यात जाऊन कबुली दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates