नाशिक: आता बोला… रुग्णालयाच्या बाहेरून चक्क बसचे चाकच चोरून नेले !
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या समोरील सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या एका बसचे अज्ञात चोरट्यांनी स्टेपनीचे डिक्कीत ठेवलेले चाक चोरून नेल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे….
- नाशिक: सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेत 18 वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या
- नाशिकच्या अल्पवयीन मुलीला पळविले, पैसे संपल्यावर तिला एकटे सोडून प्रियकराचे पलायन…
याबाबत सविस्तर माहिती अशी की, (दि.३० रात्री साडेदहा ते 31 सकाळी सहा वाजेच्या दरम्यान) जिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ जितेंद्र रमेशचंद्र कटारिया (31,रा. ग्राम जरोली,ता. कसरावत,जि. खरगोन राज्य मध्य प्रदेश ) यांनी त्यांची बस लावली होती. दरम्यान सकाळी ते झोपेतून उठल्यावर त्यांनी बसची तपासणी केली असता गाडीच्या डिक्कीत असलेले बसचे चाक चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास वपोनी सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक केशव आडके करीत आहेत.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790