तब्बल १४ घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना यश

तब्बल १४ घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना यश

नाशिक (प्रतिनिधी): पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पत्रकार परिषद घेऊन नाशिक पोलिसांच्या मोठ्या यशाची माहिती दिली आहे.

खूनाच्या गुह्यात तब्बल वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या सराईतासह त्याच्या दोन साथीदारांना जेरबंद करण्यात अंबड पोलिसांना यश आले असून, त्यांच्या अटकेने सिडको आणि सातपूर मधील १४ घरफोड्यांची उकल झाली आहे.

या कारवाईत कार, दोन मोटारसायकलीसह सोने असा सुमारे २० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली.

हे ही वाचा:  नाशिक: खुनातील संशयित 14 महिन्यांनंतर ताब्यात; सिडकोतील 'या' मृत्यूप्रकरणाचा उलगडा !

या त्रिकुटाचे अजून काही साथिदार असल्याची शक्यता असल्याने त्यांचा शोध घेवून संबधीतावर मोक्कान्वये कारवाई करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्याचेही नाईकनवरे यांनी स्पष्ट केले.

आयुक्त नाईकनवरे म्हणाले की. अभिषेक उध्दव विश्वकर्मा (२१),करण अण्णा कडूसकर(२३) व ऋषिकेश अशोक राजगिरे (२१ रा.सर्व अंबड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. गेल्या वर्षी चुंचाळे शिवारात झालेल्या खूनाच्या गुह्यातील तीघे संशयित आरोपी असून विश्वकर्मा हा भावजयीच्या प्रियकराची हत्या करून पसारा झाला होता. अंबड औद्योगीक वसाहतीसह सिडको भागात घरफोड्या वाढल्याने अंबड पोलिस कामाला लागले होते.

हे ही वाचा:  नाशिक: चोरीच्या ४ मोटार सायकलसह २ चोरटे गजाआड

गेल्या महिन्यात वरिष्ठ निरीक्षक भगिरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक औद्योगीक वसाहतीतील एका कंपनीत झालेल्या चोरीचा शोध घेत असतांना विश्वकर्माचा समावेश असल्याचे समोर आल्याने पोलिस सतर्क झाले होते. पोलिसांनी खबºयांच्या माध्यमातून कडूसकर यास चुंचाळे शिवारात बेड्या ठोकल्या असता विश्वकर्मा चाकण (पुणे) येथे तर राजगिरे जिह्यातील पेठ येथे असल्याची माहिती हाती लागली होती. पोलिसांनी माहितीच्या आधारे पुणे व पेठ गाठून दोघांना ताब्यात घेतले असून त्यांनी अंबड हद्दीत तेरा तर सातपूर मध्ये एक घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790