नाशिक (प्रतिनिधी): पत्नीने शरीर संबंधास नकार दिला म्हणून पतीने तिचा पहाटेच्या सुमारास गळा आवळून आणि चेहऱ्यावर दगडी पाटा मारून निर्घुण खून केल्याची घटना पंचवटी परिसरात घडली आहे. संशयित आरोपी सागर गणपत पारधी (वय २३, राहणार: मुंजोबा गल्ली, तीन पुतळ्याच्या मागे, फुले नगर पंचवटी) याला त्याची पत्नी आरती हिने शरीर संबंधास नकार दिला. याचा सागरला राग आला आणि त्याने १८ जुलै रोजी पाहते साडे तीनच्या सुमारास तिचा गळा आवळून आणि चेहऱ्यावर दगडी पाटा मारून खून केला. त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरीरसंबंधास नकार दिला म्हणून त्याने केला पत्नीचा खून; पंचवटीतील घटना
8 months ago