पत्नीसोबत प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणावर हल्ला

पत्नीसोबत प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणावर हल्ला

नाशिक (प्रतिनिधी): पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून संशयित व त्याच्या मित्राने तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार प्रमोद महाजन गार्डनजवळ एका अपार्टमेंटमध्ये घडला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर दवाखान्यात उपचार सुरू आहे. सरकारवाडा पोलिसांत संशयित उदय अरुण तिडके व त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती व राहुल निखाडे (रा. गंगापूररोड) यांच्या तक्रारीनुसार, संशयित तिडके व त्याच्या दोघा साथीदारांनी घराते प्रवेश करत शिवीगाळ करत धारदार शस्त्राने डोक्यावर, हातावर वार केले. यात निखाडे गंभीर जखमी झाले. त्यास जखमी अवस्थेत दवाखान्यात दाखल केले. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
सावधान नाशिककर: आता विना हेल्मेट वाहन चालवतांना आढळल्यास होणार ही कारवाई…