दिवसभर का झालं वोडाफोन-आयडियाचं नेटवर्क फेल? बघा काय म्हणाले Vi कस्टमर केअर

नाशिक (प्रतिनिधी) : सध्या टीव्ही आणि सगळीकडेच जोरदार सुरु असलेल्या वोडाफोन-आयडिया चे नेटवर्क आज दिवसभर लपंडाव खेळत होते. त्यामुळे अनेक ग्राहकांनी सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

पुण्यात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच भागात वोडाफोन आणि आयडियाच्या नेटवर्कला अडचण येत आहे. vi च्या या तांत्रिक फेल्युअरचा ग्राहकांना तब्बल १०-१२ तास त्रास सहन करावा लागला आहे. त्यात नेटवर्क नसल्याने ग्राहकांना कस्टमर केअरशी संपर्क साधायला सुद्धा अडचणी येत आहेत. यावर vi कस्टमर केअरने ट्वीट करून सांगितले की “पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आमच्या सर्विसमध्ये तांत्रिक बिगड झाला आहे. आमची टेक्निकल टीम यावर काम करत असून आमची सर्विस लवकरच सुरु करू. ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.