जिल्ह्यात आजपर्यंत ७८ हजार ६४२ रुग्ण कोरोनामुक्त; ७ हजार ६८२ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ७८ हजार ६४२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ७ हजार ६८२ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत १ हजार ५६४  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ६०२, चांदवड १२३, सिन्नर ९६३, दिंडोरी २७७, निफाड ७३८, देवळा ५६,  नांदगांव २४२, येवला १०९, त्र्यंबकेश्वर १०८, सुरगाणा १२, पेठ ३७, कळवण ९२,  बागलाण २०९, इगतपुरी १०८, मालेगांव ग्रामीण २०० असे एकूण ३  हजार ८७६  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार ४३५ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २४५  तर जिल्ह्याबाहेरील १२६  असे एकूण ७ हजार ६८२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ८७  हजार ८८८  रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: आईचंच काळीज ते! लेकराचा मृत्यू झाल्याचं कळलं, आईनेही प्राण सोडला

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ८२.१३,  टक्के, नाशिक शहरात ९२.७२ टक्के, मालेगाव मध्ये  ८९.८६ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७४.८४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८९.४८ इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ५३८, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ८२८ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १६२ व जिल्हा बाहेरील ३६ अशा एकूण १ हजार ५६४  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव कार पलटी होऊन दोघांचा मृत्यू; समृध्दी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

(वरील आकडेवारी आज दि. १६ ऑक्टोबर २०२० सकाळी ११.०० वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790