जिल्ह्यात आजपर्यंत ३१ हजार १४१ रुग्ण कोरोनामुक्त; ७ हजार १११ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३१  हजार १४१  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ७ हजार १११ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ८९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक ३८०, चांदवड ५०, सिन्नर ३९८, दिंडोरी ६०, निफाड ४१२, देवळा ६८,  नांदगांव २६१, येवला ६३, त्र्यंबकेश्वर ३४, सुरगाणा ०६, पेठ ०६, कळवण १०,  बागलाण १९०, इगतपुरी ६५, मालेगांव ग्रामीण २९० असे एकूण २ हजार २९३  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४ हजार १९८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६०५  तर जिल्ह्याबाहेरील १५ असे एकूण ७ हजार १११  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ३९  हजार १४६  रुग्ण आढळून आले आहेत.

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी :

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७३.४५,  टक्के, नाशिक शहरात ८२.३६ टक्के, मालेगाव मध्ये  ७३.०६  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८२.९७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ७९.५५ इतके आहे.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

आतापर्यंत झालेले मृत्यु :

नाशिक ग्रामीण २५१, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ५०६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ११३ व जिल्हा बाहेरील २३ अशा एकूण ८९४  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

(वरील आकडेवारी आज सकाळी ११.०० वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here