महाराष्ट्रातील रेस्टॉरंट व्यवसाय त्वरित सुरू करा- रेस्टॉरंट व्यावसायिकांची मागणी

नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लब चे मुख्य समन्वयक व नाशिक रेस्टॉरंट क्लब चे संस्थापक वेदांशू पाटील यांनी महाराष्ट्रातील सुमारे 250 रेस्टॉरंट चालक, मालक व रेस्टॉरंट क्षेत्राशी निगडित असणाऱ्या उद्योजकांना संघटित करून रेस्टॉरंट सुरू करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्रातील रेस्टॉरंट गेली ६ महिने पूर्णपणे बंद आहेत.अनेक रेस्टॉरंटद्वारे शासनाने अधोरेखित केलेल्या नियम व अटींसहित जरी पार्सल सुविधा मान्य केली असली तरी व्यवसायाच्या उदरनिर्वाहासाठी ती पुरेशी नाही. त्यामुळे रेस्टॉरंट चालक व त्याव्यवसायावर अवलंबून असणाऱ्या अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक रेस्टॉरंट चालकांचा रेस्टॉरंट हाच मूळ व्यवसाय असल्यामुळे रेस्टॉरंट चालक हे प्रचंड मानसिक तणावाखाली जगत आहेत.

कित्तेक रेस्टॉरंट चालकांना धंदा पूर्णपणे ठप्प असतांनाही जागा भाडे, माणसांचा पगार, किमान लाईट बिल आदी बाबींच्या खर्चाचा भार उचलावा लागत असल्याने प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतआहे . यात काही नवव्यावसायिकांनी बँक लो’न देखील काढले असून त्यांच्या कर्जाचे हफ्ते भरण्याचे मोठे आवाहन अश्या उद्योजकांसमोर उभे राहिले आहे.

महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लबच्या वतीने क्लबचे मुख्य समन्वयक वेदांशू पाटील यांनी पुढील मागण्या आपल्या निवेदनाच्या माध्यमातून शासनासमोर मांडल्या आहेत.

१) रेस्टॉरंट व्यवसाय लवकरात लवकर पूर्ववत सुरु करण्यास परवानगी मिळावी.

२) बैठक व्यवस्थेवर काही निर्बंध लादायचे असल्यास त्याची तीव्रता कमी असावी.

३) भाडेतत्वावर सुरु असणाऱ्या रेस्टॉरंटना भाडेमाही मिळावी.

४) रेस्टॉरंट सुरु ठेवण्याची वेळ वाढवून सायं. १०:०० पर्यंत करून मिळावी.

५) अनेक शहरांत किचन वेस्ट जमा करण्या करिता घंटागाडी बंद आहेत त्या लवकरात लवकर सुरु करण्यात याव्यात.

६) कर्जाच्या थकबाकीत किमान ६ महिन्यांच्या व्याजात सूट मिळावी.

७) लॉकडाउन असल्याने अनेक कच्या मालांच्या किंमतीत कमालीची वाढ झाली आहे, त्यावर नियंत्रण मिळवण्यास शासन स्थरावर प्रयत्न व्हावेत.

८) लॉकडाउन काळात आकारण्यात आलेल्या विजबिलात पूर्णतः सूट मिळावी.

कोरोना या जागतिक महामारीचा सामना करत असतांना आम्ही सर्व उद्योजक एक सुज्ञ नागरिक म्हणून शासनामार्फत जाहीर होणाऱ्या नियमावलीचे पालन करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू असेही क्लबच्या सदस्यांच्या वतीने विनंती अर्जात नमूद करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790