नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात बुधवारी (दि. २ सप्टेंबर) तब्बल ५९४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर१० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १४५३, एकूण कोरोना रुग्ण:-२६,६७१, एकूण मृत्यू:-५०६ (आजचे मृत्यू १०), घरी सोडलेले रुग्ण :- २१,९६७, उपचार घेत असलेले रुग्ण:- ४१९८ अशी संख्या झाली आहे.
नाशिक शहरात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) देवकीनंदन,कामठवाडे, सिडको, नाशिक येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. २) श्रद्धा अपार्टमेंट, गुरुप्रसाद कॉलनी, सातपूर नाशिक येथील ५९ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) श्रद्धा पार्क, रामवाडी, पंचवटी येथील ६९ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) तारा अपार्टमेंट, समर्थ लायब्ररी, गंगापूर रोड, नाशिक येथील ६१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) पोद्दार फार्म, नवश्या गणपती,गंगापूर रोड नाशिक येथील ५९ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ६ )पवन नगर, सिडको नाशिक येथील ५३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) म्हाडा कॉलनी, चुंचाळे शिवार, अंबड लिंक रोड, सातपूर येथील ७४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८) पाटोळे वाडा, नाव दरवाजा,तिवंधा चौक, भद्रकाली येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ९) महालक्ष्मी नगर, सिद्धी रेसीडन्सी,पंचवटी येथील ८२ वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. १०) एकलहरा, नाशिक येथील ५६ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.