कॅफे मध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लर वर छापा…

नाशिक (प्रतिनिधी) : मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुप्त बातमीदाराकडून नाशिक शहरात चोरून लपून हुक्का पार्लर चालू असल्याची माहिती गुन्हेशोध पथकाला मिळाली. तसेच या परिसरातून अनेक तक्रारी सुद्धा येत होत्या. त्यामुळे रविवारी (दि.२) रात्रीच्या सुमारास गुन्हे शोध पथकाने या परिसरातील ‘अजीज मेन्शन कॅफे’ येथे छापा टाकून कॅफे मालकासोबत १८ आरोपींना ताब्यात घेतले.

कोरोनाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असल्याची जाणीव असून सुद्धा, विना परवानगी हुक्का कॅफे सुरु ठेवला म्हणून बंदी असलेले सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ आणि हुक्का पार्लरचे साहित्य जप्त करण्यात आले आहेत. याविरोधात कॅफे चालक अल्ताफ ईस्माईल सैय्यद आणि शहीद दस्तगीर खान यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.