Breaking

नाशिक: ऍसिड हल्ल्यातील जखमी तरुणाचा मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

नाशिक (प्रतिनिधी): ३१ मे रोजी अंबड औद्योगिक वसाहतीत एका खासगी फायनान्स कंपनीच्या थकीत कर्जाच्या हप्ता वसुलीसाठी गेलेल्या वसुली कर्मचाऱ्यांसह त्याच्या मोठ्या भावावर थकबाकीदाराने ऍसिड फेकून हल्ला केल्याचा प्रकार घडला होता.

या ऍसिड हल्ल्यात खासगी वसुली कर्मचारी गणेश फाफळे (३१, विडी कामगारनगर) यांच्यासह त्यांचे मोठे बंधू किरण फाफळे (४० रा. गणेश चौक सिडको) हेदेखील जखमी झाले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील रस्त्यांच्या कामांमुळे २५ सिटीलिंक बसफेऱ्यांच्या मार्गात बदल

त्यांना त्वरित उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर किरण फाफळे यांच्यावर नाशिक शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांनी किरण फापाळे यांनी रुग्णालयातून घरी येण्याचा निर्णय घेतला. परंतु पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल झाले.

त्यांची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी पूर्ण बरं वाटत नसतानाही दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातून घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. शनिवारी किरण फाफळे (ता. २४) यांना अचानक पोटात दुखू लागले व चक्कर येऊ लागल्याने त्यांना पुन्हा एकदा पुढील उपचारासाठी लेखानगर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेत असताना रुग्णालयात पोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  गोदावरीतील पाणवेली निर्मूलनासाठी यंत्रणांनी कार्यवाही करावी : विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम

या वेळी मयत किरण फाफळे यांच्या नातेवाइकांनी ऍसिड हल्ला करणाऱ्या तरुणावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सध्या अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

या प्रकरणाचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे चुंचाळे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मयत किरण फापळे यांच्या पश्चात वडील, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790