😊 कौतुकास्पद: जिथे कमी तिथे आम्ही: नाशिक युथ क्लबने उचलला खारीचा वाटा !

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिथे माणुसकी कमी झाल्याची उदाहरणे दिसत असताना नाशिक युथ क्लबच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन गरजूंना मदत केली. लॉकडाऊन मूळे सर्व काही बंद असताना रस्त्यावरचे गरीब, दिव्यांग, परिस्थितीने लाचार, मोलमजुरी करणारे, धावपळ करणारे अँब्युलन्स चालक आणि  दवाखान्यातील रुग्णांचे हतबल नातेवाईक ह्यांचे उपाशीपोटी होणारे हाल बघता नाशिक युथ क्लबच्या सदस्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून लोकसेवेचे कार्य अखंड सुरू ठेवले आहे.

हे ही वाचा:  नाशिकच्या 'या' सहा सराफांकडून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची एक कोटी १७ लाखांची फसवणूक

दुसऱ्या लाटेच्या अगदी सुरवातीला मार्च महिन्यापासून लोकांसाठी ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, अँब्युलन्स, हॉस्पिटल सामग्री आणि महत्त्वाची औषधे इत्यादींची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी ह्या सदस्यांनी घेतलेल्या मेहनतीचा लाभ शेकडो गरजूंना झाला. गेल्या एक महिन्यापासून नाशिक जिल्हा रुग्णालय येथे रोज संध्याकाळी 250 पेक्षा जास्त लोकांना फूड पॅकेट सोबत बिस्कीट पुडा आणि पाणी बॉटल असे वाटप केले जात आहे. याच काळात अनेक कुटुंबांसाठी 15 दिवसांची किराणा सामग्री, धान्य, वस्तू आणि गरजू साहित्य वाटप सुद्धा करण्यात आले. आता पर्यंत शंभराहून अधिक कुटुंबांना त्यांनी साहित्य पुरवून मदतीचा हात दिला.

हे ही वाचा:  नाशिकचे प्रख्यात डॉ. कैलास राठी यांच्यावर जीवघेणा हल्ला

नाशिक युथ क्लबच्या ह्या अभिमानास्पद कार्यात रविराज लभडे पाटील, अमोल कासार, ऋषिकेश पाटील, सुमित रायते, वैशाली कांकरिया, अंकिता अहिरे, ओमेश सोनार,  राज ठाकुर, सागर कालकर, अभिषेक दुसाने, गौरव सूर्यवंशी आणि सर्व सदस्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

नाशिक युथ क्लबच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून समाजातील अनेक दानशूर व्यक्ती, व्यावसायिक, शेतकरी आणि सुशिक्षित लोकांनी भरभरून मदत केली आहे. अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, संस्था, संघटना आणि समाजमाध्यमं नाशिक युथ क्लबच्या कार्याला पाठिंबा देऊन प्रोत्साहित करत आहेत. लोकमतचा देखील अश्या तरुणाईच्या अभिमानास्पद कार्याला कायम पाठिंबा आणि सहयोग राहील.

हे ही वाचा:  नाशिक: सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अमली पदार्थ नेण्यास बंदी

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790