नाशिक (प्रतिनिधी): राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विकसित केलेल्या एम. ए. इतिहास या शिक्षणक्रमाचे प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने सुरु करण्यात आले आहेत. प्रवेशाची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या जवळचे अभ्यासकेंद्र निवडून प्रवेश निश्चित करावा. या शिक्षणक्रमासाठी विद्यापीठाने १७५ अभ्यासकेंद्रे सुरु केली आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी या शिक्षणक्रमाच्या प्रवेशास पात्र आहेत.
अभ्यासकेंद्रावरून संपर्क सत्राची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या जवळच्या अभ्यासकेंद्रांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑनलाइन प्रवेशासाठी www.ycmou.ac.in किंवा https://ycmou.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावर भेट द्यावी. विद्यार्थी हेल्पलाइन: (०२५३) २२३०५८०, २२३१७१५, २२३०१०६, २२३१७१४ यावर संपर्क साधावा. असे आवाहन मुक्त विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.