पुढचे तीन तास महत्त्वाचे; मुंबईसह पुणे आणि नाशिकला अतिमुसळधार पावसाचा इशारा !

मुंबई। दि. १९ ऑगस्ट २०२५ (दु. २.४० वा.): मुसळधार पावसानं सतत धावणाऱ्या मुंबईला ठप्प केलं आहे. मुंबईची अक्षरशः तुंबई झाली आहे. पावसाच्या कोसळधारेमुळे अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मिठी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच, मुंबईला देण्यात आलेला रेड अलर्ट पुढील 3 तासांसाठी कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई, रायगड, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: भरधाव बुलेटने दिलेल्या धडकेत ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू

मुंबई आणि लगतच्या उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मिठी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे मिठी नदी परिसरात एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनही मिठी नदी परिसरात पाहणी करण्यात आली आहे. मिठी नदीनं धोक्याची पातळी गाठल्याचं बघता मिठी नदी लगत राहणाऱ्या रहिवाशांना स्थलांतरित होण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. पालिकेनेही कुर्ला परिसरातील सखल भागातील सुमारे 350 नागरिकांचं स्थलांतर केलं आहे. या ठिकाणी सदर नागरिकांच्या खानपानाची व्यवस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: हल्ल्यातील युवकाचा मृत्यू; संशयित उद्धव निमसे फरार

मुसळधार पावसामुळे लाईफलाईन ठप्प:
मुंबईसह उपनगरात झालेल्या पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूकही खोळंबली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून ठाण्यापर्यंत रेल्वेसेवा सुरू आहे. जोरदार पावसामुळे विरार आणि वसई दरम्यान लोकल गाड्या बंद आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत सेवा सुरू राहणार नाही.

👉 हे ही वाचा:  नाशिक: आनंददायी आणि सुरक्षित कुंभकरीता प्रशासन प्रयत्नशील- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

मिठी नदीची पाणीपातळी वाढली:
बृहन्मुंबई महानगरपालिका परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पातळी 3.9 मीटर इतकी वाढली होती. ही बाब लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून क्रांतीनगर, कुर्ला या परिसरातील सखल भागातील सुमारे 350 नागरिकांचे स्थलांतर हे तात्पुरत्या निवाऱ्याचे ठिकाण असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मगनदास मथुराम मनपा शाळेत करण्यात आले आहे. या ठिकाणी सदर नागरिकांच्या खानपानाची व्यवस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790